सिल्लोडला विद्यार्थी समुपदेशन, व्यवसाय मार्गदर्शन विषयावर कार्यशाळा

Foto
सिल्लोड (प्रतिनिधी) :  इंद्रराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे विद्यार्थी समुपदेशन व व्यवसाय मार्गदर्शन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. 

कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य प्रा.डॉ. गुरुदत्त राजपूत यांच्या हस्ते झाले. उद्घाटनपर मनोगतात प्राचार्य गुरुदत्त राजपूत म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतात. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळते.

कार्यशाळेचे समन्वयक प्रोफेसर जालिंदर अंभोरे यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचा हेतू केवळ पुस्तकी ज्ञान देणे नसून विद्यार्थ्यांना जीवनाभिमुख शिक्षण देणे हा आहे. व्यक्तिमत्त्व विकास, संवादकौशल्य आणि स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन एकत्रितपणे मिळाल्यास विद्यार्थी आत्मनिर्भर बनतात. असे मत व्यक्त केले. 

पहील्या सत्रामध्ये प्रा.डॉ. उमाकांत गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ङ्गव्यक्तिमत्त्व म्हणजे केवळ बाह्य रूप नव्हे, तर विचार, वागणूक, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचा संगम आहे. त्यांनी आत्मविश्वास, वेळेचे नियोजन आणि सकारात्मक विचारसरणी यांवर भर दिला. अध्यक्षस्थानी क्रीडा विभागाचे संचालक प्रा.डॉ. 
माधवसिंग इंगळे होते. त्यांनी खेळातून शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात, असे सांगितले. दूसरे सत्रामध्ये मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. अनिरुद्ध मोरे यांनी या सत्रात लेखन व संभाषण कौशल्यांचे महत्त्व विशद केले.

 "प्रभावी संवाद हा यशाचा पाया आहे. नियमित वाचन, लेखनाचा सराव आणि स्पष्ट व आत्मविश्वासपूर्ण बोलणे यांतून मुलाखती व सार्वजनिक व्यासपीठावर आपली छाप पाडता येते," असे म्हणाले तिसरे सत्रामध्ये डॉ रुपाली बिरादार यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले. अभ्यासक्रमाचे सखोल आकलन, नियोजनबद्ध अभ्यास, जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव आणि सातत्य यांवर त्यांनी भर दिला.

समारोप समारंभात प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. उमाकांत गायकवाड, अध्यक्ष प्राचार्य डॉ. गुरुदत्त राजपूत होते. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. गुरुदत्त राजपूत यांनी सांगितले, ङ्गङ्गकेवळ पदवी घेणे पुरेसे नाही, तर कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी आपली आवड, क्षमता आणि करिअरच्या संधी ओळखून ध्येय निश्चित करावे. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. जितेंद्र पाटील, प्रा. अमित गवई, डॉ. सुमेध खरात यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.